अंतरराष्ट्रीय योग दिवस रोटरी क्लब हिंगणघाट आणि गीमाटेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा

अब्दुल कदिर बख्श
हिंगणघाट, २१ जून २०२५ —अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब, हिंगणघाट, गीमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि रोटरी कम्युनिटी कॉर्प्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत करणे हा होता.योग शिबिराला रोटेरियन सदस्यांनी आणि गीमाटेक्सच्या कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.योग सत्रांचे मार्गदर्शन पतंजली योग समितीचे प्रमाणित योग प्रशिक्षक राहुल वंजारे यांनी अत्यंत कुशलतेने केले. त्यांनी विविध आसने, प्राणायाम व योगाभ्यास शिकवून सर्वांगीण आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमास रोटरी क्लब हिंगणघाटचे अध्यक्ष सीए जितेंद्र वर्मा,संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक मुखी, तसेच सचिव उदय शेंडे आणि सुभाष कटारीया उपस्थित होते. गीमाटेक्स इंडस्ट्रीज कडून अध्यक्ष गौतम ढांग आणि मानव संसाधन व्यवस्थापक राजीव शर्मा यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आणि आयोजन यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.राहुल वंजारे यांना जिल्हा आणि राज्यस्तरीय योग स्पर्धांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल गीमाटेक्स इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब यांच्यातर्फे संयुक्तरित्या गौरविण्यात आले.अध्यक्ष सीए जितेंद्र वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, योग हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण राहते. सचिव उदय शेंडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमास हातभार लावणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अनेक रोटेरियन सदस्यांचा विशेष सहभाग राहिला. श्रीमती मंजुषा मुले, विजय पात्रा, मितेश जोशी, पुंडलिक बकाने, केदार जोगलेकर आणि सतीश डांगरे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय राहिले.