महाआरोग्य शिबीरात २,११७ तपासण्या, ६८५ रूग्णांना मोफत चष्मे वाटप

प्रतीनीधी दिनेश डहाके पुसला
अमरावती:वरूड शहरातील न्यु इंग्लिश प्रायमरी स्कूल मध्ये आशा चॅरिटेबल ट्रस्ट वरूड, शालिनी मेघे हॉस्पिटल नागपूर, महात्मे आय हॉस्पिटल नागपूर व भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांच्या नेतृत्वात रविवारी निःशुल्क महोआरोग्य व नेत्र तपासणी शिबीर पार पडले. यामध्ये एकुण २,११७ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून एकुण ५१८ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. तसेच ६८५ रुग्णांना चष्म्याचे वितरण करण्यात आले आहे.
शिबीराची सुरूवात आ.चंदु यावलकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतीमेचे पुजन, हारर्पन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.त्यानंतर भाजपाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ.यावलकर यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आ.यावलकर बोलताना म्हणाले की, कुठल्याही रूग्णांची आरोग्य शिबिरातुन हेडसांड न होता त्यांना चांगल्या प्रकारे तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते मोफत उपचार घेता यावे याकरिता आशा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. आमदार होण्यापूर्वी पासुन हा वसा मी व माझे सहकारी मित्र चांगल्या प्रकारे पार पाडत आलो आहे. अशा प्रकारे शिबीर घेउन गरजुना मोफत उपचार व मोफत औषधी, मोफत चष्मे देत आहो, हि ईश्वर सेवा निरंतर अशीच सुरू राहावी व याचा विस्तार सुद्धा पुढे असाच वाढत राहावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. गरजु नागरिकांना एक रूपया खर्च न करता औषध व उपचार घेता यावा, विविध तपासण्या करता याव्यात व त्यांचे आरोग्य सदैव निरोगी राहावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी महिन्यातुन तीन शिबीर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यानंतर आ.यावलकर यांनी शिबीर स्थळाची पाहणी करत उपस्थित डॉक्टर व रूग्णांशी संवाद साधला. या महाआरोग्य शिबीरात मेघे व महात्मे यांच्या टिम मधील तज्ञ डॉक्टरांनी एकुण २,११७ रूग्णांची तपासणी केली. यामधील ५१८ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये महात्मे आय हॉस्पिटल व्दारा मोतीयाबिंदु रूग्णांवर ९ व १० जुलै रोजी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. तर शालिनी मेघे हॉस्पिटल व्दारा इतर रुग्णांवर ११ , १३ व १५ जुलै रोजी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. सर्व रूग्णांसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध राहणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते विविध रोगांच्या तपासण्या करून सर्व रूग्णांना शिबीर स्थळीच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले आहे तसेच ६८५ रूग्णांना शिबीर स्थळीच चष्मे वाटप करण्यात आले आहे. या शिबिरासाठी आशा चॅरिटेबल ट्रस्ट, वरूड व स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिराला आषाढी एकादशी निमित्त उपस्थित सर्व नागरिकांना फराळ वाटप करण्यात आले आहे.