मोफत नेत्र मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर, बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहयोगाने मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर १२ जुलै रोजी श्रमिक भवन बल्लारपूर येथे करण्यात आले होते. यामध्ये सुमारे २५० जणांची मोफत तपासणी करण्यात आली व त्यापैकी ५२ जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांचे हस्ते झाले. या वेळी भाजप ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजप शहराध्यक्ष ॲड.रणंजय सिंह, भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली जोशी, बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे सचिव वीरेंद्र आर्य, तारा सिंग कलसी, सुदर्शन पुल्ली, नायर विश्वस्त आयडीएल स्कूल बल्लारपूर, रामदास वाग्दरकर विश्वस्त आयडीएल स्कूल, शाळेचे मुख्याध्यापक विजय कोठारकर प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाची आखणी ओमप्रकाश प्रसाद, दीपमाला यादव, नजमा खान, गणेश लाल चौधरी, घनश्याम बुरडकर, अजय खोब्रागडे, कांता ढोके, आरती आक्केवार, अशोक देशमुख यांनी केले होते. ॲड राजेश शहा, गुलशन खान, प्रमोद रामिल्ला, सरोज सिंह, सर्वेश मिश्रा, सीमा बनिया, रेणू रॉय, उमेश शाह, विजयालक्ष्मी वास्तव, कीर्ती धानोरकर, संगीता चौहान, दमयंती शर्मा, शैला तावाडे, रेखा चंदाले तहजीब खान यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.