आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक योग दिनानिमित्त केला योग

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : आज जागतिक योग दिनाच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील बल्लारपूर येथे बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पतंजली योग पीठ आणि भाजपा यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय योग शिबिरात सहभागी होऊन योगासन केले. येथे योगासने करून हजारो लोकांनी लाभ घेतला आहे.योगगुरू म्हणून पतंजलीचे योगसाधक ऋषीपाल गेहलोत यांनी योग शिकवला, त्याचप्रमाणे अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त कृष्णा गेहलोत यांनी एक हजार सिट - अप आणि पाचशे सूर्यनमस्कार करून लोकांना चकित केले. आ. मुनगंटीवार यांनी योगासने करून निरोगी राहण्याचा योग मंत्र नागरिकांना दिला आहे.नागरिकांनी या योग शिबिराचा मनमुराद आनंद लुटला. योगा डान्स टीम चंद्रपूरच्या योगा नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही योग नृत्याचा आनंद लुटला त्यांनीही योग नृत्यात सहभाग घेतला. या जागतिक योग दिन शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिनाथ सिंग, रणंजय सिंग, सतविंदर सिंग दारी, समीर केणे, नीलेश खरबडे, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम, किशोर मोहुर्ले, मनीष पांडे, गुलशन शर्मा, स्वामी रायबरम, घनश्याम बुरडकर, दशरफ येलय्या, राजकुमार श्रीवास्तव आदींनी प्रयत्न केले.