समुद्रपूर येथे आंबेडकरी कलावंतांचा महामेळावा यशस्वीपणे संपन्न

Sun 13-Jul-2025,12:59 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी, विलास लभाने ( समुद्रपुर )

संबोधी कला मंच व सरवर जानी फॅन्स क्लब हिंगणघाट-समुद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओम जयकारा हॉल, समुद्रपूर येथे एक भव्य ‘आंबेडकरी कलावंत महामेळावा’ संपन्न झाला. हा महामेळावा स्वरसम्राट सरवर जानी व स्वरसम्राट मनोहर दीप रुसवा यांच्या स्मृतीपित्यर्थ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली.

प्रमुख मान्यवर आणि गौरव सोहळा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. योगिता ताई तूळणकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते अशोकभाऊ रामटेके आणि प्रा. डी. एम. महाकाळे सर उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रदिपभाऊ डगवार, डॉ. सोनम मेंढे, बाळाभाऊ मानकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

कलावंतांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मंचीय मैफल

महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले गायक, कव्वाल, शायर, वादक यांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कव्वाली, शायरी व संगीतमय सादरीकरणे यांची रंगतदार मेजवानी मिळाली.गुरुवर्य परमानंद भारती आणि गुरुवर्य अशोक दीप भगत यांना गुरुशिष्य परंपरेचा सन्मान म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

 पत्रकार बांधवांचा विशेष सन्मान

समाजासाठी सतत कार्यरत असणाऱ्या समुद्रपूर तालुक्यातील पत्रकार बंधू – श्री. राजू कांबळे, किशोर शेंडे, मनवर शेख, अब्दुल कदीर, प्रदीप डगवार, प्रमोद झिबड, गौतम शेळके यांचा सन्मानपत्र आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

संपूर्ण यशाचे श्रेय आयोजकांना

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महानंद भगत, जयंत फुललेले, प्रणय सतलज (शायर), सुरेश भगत, रंजीत कांबळे, सोनू मेश्राम आदी आयोजक मंडळींनी अतिशय नेटकेपणे पार पाडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर सर्व पत्रकार बंधूंनी आयोजक व समाजसेवक सुरेशभाऊ भगत यांचे आभार मानले.