सरपंच पदाचे आरक्षण जाहीर : विसापुर नामाप्र (स्त्री) तर कोठारी सर्वसाधारण

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:बल्लारपूर तालुक्यात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात काढली गेली. बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणूक नंतर कोणत्या जाती प्रवर्गातील महिलांना सरपंच पद मिळणार आहे, याची उतसुकता होती. ही आरक्षण सोडत ही सन २०२५-२०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आले. त्यात विसापुर नामाप्र (स्त्री) तर कोठारी सर्वसाधारण सरपंचपदासाठी आरक्षित आहे.नांदगाव (पोडे ) नामाप्रा, हडस्ती अनुसूचित जमाती, पळसगाव नामाप्र, मानोरा अनुसूचित जमाती (स्त्री), किन्ही सर्वसाधारण (स्त्री), कोर्टीमक्ता सर्वसाधारण, गिलबिली अनुसूचित जाती (स्त्री), आमडी अनुसूचित जमाती, कळमना नामाप्र (स्त्री), लावारी अनुसूचित जमाती (स्त्री) दहेली अनुसूचित जाती, कवडजई सर्वसाधारण (स्त्री), बामणी नामाप्र, इटोली चक अनुसूचित जाती (स्त्री), काटवली सर्वसाधारण (स्त्री) राखीव करण्यात आले आहे सर्वसाधारण प्रवर्ग करीता ८ तर महिला करीता ९ आरक्षित केले आहे.सदर आरक्षण सोडत तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या उपस्थित काढण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार (निवडणूक) दिपक घुटके, नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले नायब तहसीलदार अजय मल्लेवार,नायब तहसीलदार सतिश साळवे सह तहसील कार्यालय चे कर्मचारी उपस्थित होते.