गर्भवती महिला पडली खड्यात

Sun 13-Jul-2025,01:12 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगाव:- नगरपरिषद अंतर्गत व बाजार समिती परिक्षेत्रातील धान गिरणी वळणावरील खचलेल्या नाले रस्त्यावरील फुलावर गर्भवती महिला खड्यात पडल्याने जखमी झाल्याची घेटनेने प्रशासनाची एकदा पून्हा पोलखोल केली.खड्यात पडलेल्या जखमी महिलेला नागरिकांनी धावपळ करीत तिची मदत करीत खड्यातून बाहेर काढले.त्यामुळे तिचे जीव थोडक्याय बचावले.आमगाव नगर परिषद व कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने परिसरातील रस्ते नाल्याच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागीकांना मार्गक्रम करताना ताऱ्यावरची कसरत करावी लागतं आहे.नागरिकांना जीव मुठीत घेऊन या खडसर मार्गावरून प्रवास करावा लागतं आहे.मात्र स्थानिक प्रशासनाने दखल घेणे टाळले आहे.आमगाव नगरपरिषद प्रशासन व कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव यांच्या अंतर्गत येणारे रस्ते हे खड्यात रूपांतरीत झाले आहे.तर सांडपाणी जाणारे नाल्या तुटून पडल्याने रस्त्यातील पूलही पडून खचले आहे. मागील अनेक वर्षापासून या समस्यांना नागरिक त्रास सहन करून आवागमन करीत आहेत.या रस्त्यांची बांधकाम व नाल्यांची दुरुस्ती,पुलांवरील बांधकाम यांचे नियोजन शून्य असल्यामुळे समस्या" तीन वर्ष पासून जैसे थे वैसे: अशा अवस्थेत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव अंतर्गत येणारा परिसर खड्डेमय व रस्ते गलिच्छ पडल्या आहेत.तुडुंब भरलेला कचरा यामुळे आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांची हयगय कायम आहे.तर परिसरातील नाल्या सफाई होत नसल्याने परिसरात आरोग्याची समस्या कायमच आहे. मार्गावरील रस्ते खालील पूल तुटून पडल्याने मोठे खड्डे पडले आहेत.सदर समस्या प्रशासनाकडे लक्ष केंद्रित करून सुद्धा कृषि उत्पन्न बाजार समिती व नगर पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.त्यामुळेच आठवडी बाजारातून मार्गक्रम करणारी गरोदर महिला सरळ धानगीरणी समोरील नाल्यातील खड्यात पडून जखमी झाली.नागरिकांनी महिलेला खड्यातून बाहेर काढून प्रथम उपचार कारिता मदत केली. यात थोडक्यात गरोदर महिलाचे जीव वाचविण्यास यश आले. या घटनेची दखल घेत कृषि उत्पन्न बाजार समिती व नगर परिषद प्रशासन रस्ते नाल्यांची बांधकामे करणार काय असा सवाल नागरिक करीत आहेत.