अग्रवाल विज्ञान महाविद्यालयाच्या स्नातकोत्तर रसायनशास्त्र विद्यार्थ्यांचा गौरव

Tue 15-Jul-2025,02:45 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारा संचलित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथील रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या दोन विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या यादीमध्ये दुसरा व पाचवा क्रमांक पटकाविला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी पदव्युत्तर 2025 या परीक्षेमध्ये कु.तृप्ती ठाकरे विद्यापीठात द्वितीय तसेच कु. उर्वशी येटरे विद्यापीठात पाचवी असे गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. या विद्यार्थिनींना रसायनशास्त्र पदवीधर विभागाचे प्राध्यापक प्रा अविनाश डोणगापुरे, प्रा अविनाश ठाकरे, डॉ. उमेश कोसुरकर, डॉ.गिरीश देशमुख व डॉ. शिरीनाज सय्यद यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचा महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.एस.नारायण मूर्ती सर्व रसायनशास्त्र स्नातकोत्तर प्राध्यापक वृंद यांचे हस्ते गौरव व सत्कार करण्यात यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.