नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा काटोल येथे प्रवेशोत्सव थाटात साजरा करण्यात आला

प्रतिनिधी राहील शेख काटोल
काटोल:नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 2 काटोल येथे नुकताच शाळा प्रवेशोत्सव थाटात पार पडला.यावेळी शाळेत पहिल्यांदाच पहिले पाऊल ठेवणारे आणि आई वडिलांपासून नुकतेच नविन वातावरणात समरस होणारे वर्ग पहिलीचे विद्यार्थी यांचे आणि पालकांचे पुष्प गुच्छ आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यासाठी नगर परिषद काटोल चे उपमुख्याधीकारी उमेश हेमबाडे हे होते त्यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले तसेच आपल्या मार्गदर्शनातून नगर परिषद शाळेचे महत्व पालकांना सांगितले.खाजगी शाळा व सरकारी शाळा यातील फरक पालकांना सांगितला.यावेळी शाळेचे मुख्याघ्यापक उत्तम मानकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच विद्यार्थी यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात आले.शेवटी गोड पदार्थ खाऊ घातले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
Related News
शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार – यशवंत महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन
2 days ago | Arbaz Pathan
शिक्षणाबरोबर खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक–इमरान राही”
31-Aug-2025 | Sajid Pathan