नवीन कार्यकारणी घोषित आमगाव तालुका पत्रकार संघाचे नवे अध्यक्ष रितेश अग्रवाल

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
आमगाव : येथील आदर्श विद्यालयात दि २२ जून रोजी आमगाव तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी माजी अध्यक्ष इशुलाल भालेकर व मावळते अध्यक्ष झेड.एस. बोरकर यांनी संघाच्या स्थापनेपासून आलेल्या अनुभवाचे कथन केले. पत्रकारांचे अधिकार व शासनाकडून पत्रकारांना मिळणाऱ्या विविध योजनांची विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच संघाचे योग्य दिशेने क्रियांवहन होण्याच्या दृष्टीने संघातील सर्व सदस्यांनी समर्पित भावाने कार्य करण्याची आवाहन केले. विस्तृत चर्चेनंतर त्यांच्या मार्गदर्शनात अध्यक्षपदावर रितेश अग्रवाल, उपाध्यक्ष राधाकिसन चुटे, उपाध्यक्ष सुनील पडोळे, सचिव राजीव फुंडे,सहसचिव विकास शर्मा, कोषाध्यक्ष आनंद शर्मा, प्रचार प्रमुख महेश मेश्राम यांची सर्वानुमते निवड आली. या कार्यकारणीचे इतर सदस्य नरेंद्र कावळे, सुनील क्षीरसागर, दिनेश शेंडे, अजय खेतान, यशवंत मानकर, रेखलाल टेंभरे, मुरलीधर करंडे हे आहेत.नवीन कार्यकारणीचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.