भारत सरकारच्या वित्त मंत्रालया कडुन पूर्णा साखर कारखान्याचा गौरव

Fri 04-Jul-2025,09:15 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली :- वसमत पुर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर जि. हिंगोली कडुन सन 2024-25 अखेर शासनाच्या निर्धारीत वेळेत जीएसटी रिटर्न व अनुषंगीक शासकीय देय कराचे नियमित पेमेंट भरल्याबद्दल केंद्रीय जीएसटी बोर्ड व वित्त मंत्रालय,भारत सरकार यांचेकडुन प्रशस्तीपत्र (Certificate of Appreciasion) देऊन आपले कारखान्याचा गौरव केला आहे.शासनाच्या निर्धारीत वेळेत जीएसटी रिटर्न व अनुषंगीक शासकीय देय कराचे नियमित पेमेंट भरल्याबद्दल पूर्णा साखर कारखान्याचा वित्त मंत्रालय,भारत सरकार तर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक शिस्तीत केलेल्या कामाबद्दल नमुद प्रशस्तीपत्राव्दारे केंद्र शासनाकडुन केलेला गौरव ही बाब पुर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी अभिमानाची आहे.सर्व संचालक मंडळ यांचे सह कामगार, कर्मचारी व अधिकारी यांचेपूर्णाचे उपाध्यक्ष डॉ. सुनिल शामरावजी कदम,शेती व ऊस विकास समितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई,प्र.कार्यकारी संचालक के.पी.आकुसकर यांनी अभिनंदन केले आहे