योग हाच निरोगी जीवनाचा मूलमंत्र-डॉ. मूर्ती
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा -प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारा संचलित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथे दि 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त योग व ध्यान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. नारायण मूर्ती व प्रमुख अतिथी पदी डॉ. खुशबू सोनी हे उपस्थित होते. डॉ.सोनी यांनी सर्व कर्मचारी यांचेकडून वेगवेगळ्या प्रकारचे आसन व ध्यान करवून घेतले तसेच आपण आपल्या घरी रोज योग करून कशाप्रकारे निरोगी राहू शकतो याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय आदेशानुसार वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.अपर्णा खुरसेल व रासेयो चमूच्या वतीने डॉ.संजय बिरनवार यांनी केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Related News
स्वच्छ भारत अभियान को ठेंगा दिखाते नारियल पानी विक्रेता, सड़कों पर पसरी गंदगी से हादसों का खतरा
3 days ago | Naved Pathan
सोशल मीडिया पर चला स्वच्छता अभियान, ज़मीनी हकीकत में वर्धा शहर के हालात जस के तस
6 days ago | Naved Pathan
आर्वी छोटी उपकेंद्र अंतर्गत काचनगाव ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले
03-Jan-2026 | Sajid Pathan
सावंगी मेघे में कुत्तों के हमले से घायल हुआ बंदर, युवकों की तत्परता से बची जान
25-Dec-2025 | Sajid Pathan