बहुजन पँथर सेनेची सांगली स्क्रॅप बाजार येथे नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न

Sun 20-Jul-2025,09:01 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

सांगली : सांगली येथे आज बहुजन पँथर सेनेची नविन शाखा चे उद्घाटन झाले ,या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्षा निशाताई बचुटे यांनी उपस्थित शाखेच्या सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून शाखेच्या ओपनिंगचे उदघाटन केले ,या वेळी विविध सामाजिक विषयांनवर चर्चा करण्यात आली ,आदरणीय संस्थापक अध्यक्षा निशाताईंनी उपस्थित महिला पदाधिकारी यांना मोलाचे मागदर्शन केले ,तसेच संघटनेच खंबीर नेतृत्व आसणारे. गणेश बचुटे यांनी संघटने विषयी आपली भुमिका स्ष्टपणे मांडत नवनियुक्त पदाधिकारी यांना समाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या ,शाखा ओपनिंगच्या वेळी पदाधिकारी यांनी संघटनेचा जय जय कार केला ,व आतिषबाजी करत जल्लोष केला,सांगली शाखेचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार संघटनेतील विविध पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आला ,या शाखा ओपनिंग साठी रील स्टार यांनी उपस्तिथी दर्शवली संघटनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिये शाखेचे भरपूर पदाधिकारी उपस्थीत होते,या वेळी संस्थापक अध्यक्षांनी संघटनेची माहिती सांगत आसताना संघटनेच्या कार्याचा विस्तार स्वरूपात वर्णन केले,अन्याय आत्याचारावर बोलत आसताना त्यांनी गोरगरीब नागरीकांना आत्ता पर्यंत कशी मदत केली व त्याच्या वरील अन्याय कसा दूर केला या बाबत त्यांनी सांगीतले.या कार्यक्रमास वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते , संघटनेच्या वर्धापन दिना विषयी चर्चा करण्यात आली,सांगलीतील शाखेच्या ओपनिंग वेळी , अध्यक्षा. निशाताई बचुटे,संस्थेचे रास्ट्रीय उपाध्यक्ष. गणेश बचुटे ,पश्चिम महाराष्ट्र संघटक बीपीन खिलारे,प्रणीत खांडेकर,बापू आवळे,प्रशांत कांबळे,जालिंदर वाघमारे,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सरस्वती चौगुले,शिये शाखेतील सर्व पदाधिकारी,सांगली शाखेतील नवनियुक्त पदाधिकारी,इतर संघटनेतील सर्व पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.