रक्तदान करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्या शुभेच्छा

प्रतीनीधी दिनेश डहाके पुसला
वरूड:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या महा रक्तदान या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात मंगळवार दि.२२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने वरूड मोर्शीचे भाजपा आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता पासून रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली होती.यावेळी आमदार उमेश यावलकर यांची शिबिराला प्रमुख उपस्थिती होती.लाईफ लाईन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या शिबिराचा शुभारंभ आमदार उमेश यावलकर यांनी रक्तदान करुन केला. या महा रक्तदान शिबिराला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या शिबिरात एकुण ५१ रक्तदात्यानी रक्तदान करून आपल्या लाडक्या नेत्याला सामाजिक जाणीवेतून शुभेच्छा दिल्या. यावेळी लाईफ लाईन ब्लड गृप तर्फे रक्तदात्याना प्रमाणपत्र व भेटवस्तू म्हणून लंच बॉक्सचे वितरण करण्यात आले तसेच आमदार उमेश यावलकर यांचा मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या रक्तदान शिबिरासाठी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.