शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भरपाऊसात चक्काजाम आंदोलन

Thu 24-Jul-2025,07:31 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी :-- शेतकरी कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांचे इतर मागण्यांसाठी दिनांक 24 जुलै रोजी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारण्यात आला असून त्या चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव ठाणेगाव येथील बस स्टॅन्ड वर दिनांक 24 जुलै 2025 रोज गुरुवार ला भर पावसात सकाळी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आला.आरमोरी गडचिरोली मार्ग काहि वेळेस भर पावसात घोषणा देत अडवुन धरला,काही काळ वाहतूक ठप्प झाली.गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या बाजूने प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू असून यामध्ये प्रामुख्याने जात,पात धर्म, राजकीय विचार बाजूला ठेवून सर्व शेतकरी बांधवांनी तसेच कामगार वर्ग महिला बेरोजगार वर्ग,युवा दिव्यांग ,बांधव, मेंढपाळ, मच्छिमार कामगार ग्रामपंचायतचे कर्मचारी सर्व घटक यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे त्यांच्या हितासाठी बच्चू कडू हे अहोरात्र झटत असून .येथे शेतकरी आत्महत्येच्या गावातून सातबारा कोरा कोरा या शीर्षकाखाली . तरी पण अजून पर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांचा पूर्णपणे कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आणि गप्प बसलेले सरकार यांना आता जागा करण्याची वेळ आलेली आहे यासाठीच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यामध्ये डोंगरगाव भुसारी ,ठाणेगाव बस स्टॅन्ड या ठिकाणी दिनांक 24 जुलै 2025 रोज गुरुवार ला वेळ सकाळी दहा वाजेपर्यंत भरपाऊसात चक्काजाम आंदोलन करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्याचे प्रहार चे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक ,उभाटा सेनेचे सागर मने, ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनकर , उबाठा चे तालुकाअध्यक्ष भूषण सातव, मनसेचे तालुकाध्यक्ष भाग्यवान कामथे,भारत कुमरे, प्रहारचे जिल्हा सचिव अपंग आघाडीचे अनंत भोयर, विवेक ठाकरे प्रहार चे तालुकाप्रमुख ,विकी उंदीरवाडे , होमराज माकडे यांनी दिलेले आहे सदर चक्काजाम आंदोलनामध्ये प्रामुख्याने शेतकरी आरमोरी तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अमोल मारकवार , शिवसेना उबाठा गटाचे सागर मने ,तसेच कवडू सहारे उपसरपंच माजी देऊळगाव भूषण सातव राजू सामृतवार सुधीर ठाकरे ,संतोष सेलोटे, हे सुद्धा सदर आंदोलनामध्ये प्रामुख्याने सहभागी होते.