28 जुलै रोजी वसमत येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गाढव आंदोलन

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत महाराष्ट्र विधिमंडळात जनतेच्या समस्या आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय उपाययोजना करण्यातयाव्यात यासाठी जनतेने त्यांचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडल्या जाव्यात. अशा लोकशाहीचा हेतू आहे, परंतु वर्तमानात महाराष्ट्र राज्यात सर्व या विरोधात होताना दिसत आहे. जनतेचे लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या ऐवजी जनतेला समस्येत टाकत आहेत. या सर्व बाबीला रोखण्यासाठी जनता त्यांना त्यांची हक्काची जाणीव करून देण्यासाठी सरकारी पक्षाचे मंत्री, आमदार, नेत्याच्या जुगारी, बौक्सीग, शेतकरी कार्यकर्ते यांना मारहाण करणारे मंत्री, आमदार, आणि सरकारी पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार जनतेचा, शेतक-यांचा, कामगारांचा होणारा अवमान इत्यादी मुद्द्यांच्या संदर्भाने सरकार चा निषेध करण्यासाठी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने, वसमत उपविभागीय कार्यालयावर दिनांक 28 जुलै 2025 , सोमवार रोजी "गाढव आंदोलन" करण्यात येणार आहे. या गाढव आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून, सरकारला भान आणून देण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे.
•आंदोलनातील प्रमुख मागण्या-
1. कामगारांना बॉक्सिंग 🥊 चा मार देऊन अन्याय करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करणे.2. छावा संघटनेचे शेतकरी पुत्र घाडगे पाटील यांना मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कार्यवाही करणे.3. विधिमंडळात जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन जुगार खेळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणे.4. संभाजी ब्रिगेड चे प्रविण गायकवाड यांच्या वर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करुन, प्रविण गायकवाड यांना पोलीस संरक्षण देणे.5. समित्या आणि अभ्यास वगैरे कारण न देता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर करणे.6. क्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध असल्याने तो प्रकल्प रद्द करावा.7. शेतकऱ्यांना मोदी तुमचा बाप आहे म्हणून हिनवणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करणे.8. हिंगोली जिल्ह्यातील गायराणधारकांच्या जमीनी नांवे करुन देणे.9. बेरुळा ता.औंढा जि.हिंगोली येथील गट क्रं.71 व 72 मधील 60 गुंठे जमीन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी अंदाजे 40 वर्षे पासून बौद्ध समाजाने अतिक्रमणीत केलेली असून ते अतिक्रमण नियमाकुल करणे.10. जनसुरक्षा कायदा रद्द करणे.11. आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांना अर्बन नक्षल म्हणून हिणवणारा, अक्षय भालेराव व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांची पाठराखण करणारा विधान परिषदेचा आमदार हेमंत पाटील च्या विरोधात ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार कार्यवाही करुन, विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करणे.