विक्रम ठाकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न

Wed 06-Nov-2024,02:26 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:रवि वाहणे शेंदुर्जनघाट

अमरावती:मोर्शी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले विक्रम नरेशचंद्र ठाकरे यांच्या वरुड मोर्शी व शेंदुर्जना घाट या तिन्ही शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी वरूड शहरातील महात्मा फुले चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.वरुड आणि मोर्शी तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेले विक्रम ठाकरे हे अपक्ष उमेदवार म्हणून मोर्शी विधानसभेची निवडणूक लढत आहेत. सध्या मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत असून विक्रम ठाकरे हे सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून प्रचारात आघाडीवर आहेत.त्यांनी आपला कायम ठेवलेला सततचा जनसंपर्क आणि कायम ठेवलेली विक्रम ठाकरे मित्र परिवाराची मित्रमंडळी या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला.मोर्शी विधानसभा मतदारसंघात सध्या युवा वर्गाच्या तसेच जनसामान्यांच्या आवडीचा विषय असलेले विक्रम नरेशचंद्र ठाकरे हे आपले लिफाफा हे चिन्ह घेऊन ही निवडणूक लढत आहेत.त्यांच्या प्रचार कार्यालयाचे वरुड शहरातील दिनेश खेरडे शेंदूरजनाघाट येथे रुपराव बेले तर मोर्शी येथे अँड प्रमराज वर्मा,बाबूजी जोशी या मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.वरुड शहरातील व परिसरातील विक्रम ठाकरे यांचे शेकडो समर्थक याप्रसंगी उपस्थित होते. 

या प्रसंगी माध्यमांशी बोलताना माझी उमेदवारी ही केवळ राजकारण म्हणून नव्हे तर जनसामान्यांना न्याय देण्याकरिता व मतदार संघाचा शाश्वत सर्वांगीण विकास साधण्याकरिता आहे. वरुड तसेच मोर्शी या दोन्ही शहर व तालुक्यातील समस्या केंद्रस्थानी ठेवून मी काम करणार असल्याचे प्रतिपादन विक्रम ठाकरे यांनी याप्रसंगी केले.