सालेकसा तालुक्यात विकास कामाला गती द्या कार्यकर्त्यांचा जि.प.उपाध्यक्ष हर्षे यांच्या कडे मागणी

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-जिल्ह्याच्या टोकावर असलेला सालेकसा तालुका विकास कामासाठी आतुर आहे. या तालुक्यात विकास कामाला गती प्रदान करा. अशी मागणी करत सालेकसा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी जि.प.गोंदिया चे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या कडे मागणी केली.सालेकसा तालुक्यात विविध शासकीय योजना, विकास कामे मागासलेली आहेत या कामाला जिल्हा परिषदेच्या वतीने गती प्रदान करावी अशी मागणी करत सालेकसा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषद गोंदिया चे उपाध्यक्ष आणि शिक्षण विभाग सभापती सुरेश हर्षे यांच्या कडे केली असून देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनात सर्वोत्तपरी प्रयत्न करणार तसेच जिल्हा परिषद गोंदिया च्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना, शाळकरी मुलांच्या हितासाठी गावोगावी कार्य करणार अशी हमी सुरेश हर्षे यांनी दिली.यावेळी त्यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सालेकसा तालुका अध्यक्ष डॉ. अजय उमाटे, सालेकसा शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, डॉ. हिरालाल साठवणे, बाजीराव तरोने, किसन रहांगडाले, सुरेश कुंभरे, झनकसिंग नागपुरे, सोनू दशरिया प्रामुख्याने उपस्थित होते.