5 जहाल माओवादी हत्यारासह ताब्यात भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसराततून अटक घातपात करण्याचा होता डाव

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
भामरागड :-गडचिरोली जिल्ह्यात विध्वंसक कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवाद्यांना पोलीस व सीआरपीएफ च्या पथकाने घेतले ताब्यात. यामध्ये दोन महिला माओवाद्यासह एकूण पाच जणांचा समावेश असून त्यांच्याकडून एक एसएलआर, एक 303 रायफल, तीन सिंगल शॉट रायफल्स, दोन भरमार बंदुका आणि तीन वाकी - टॉकी संच जप्त करण्यात आले आहेत.या पाचही माओवाद्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने 36 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.सदर कारवाई भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस उप पोलीस स्टेशन हद्दीतील बिनागुंडा जंगल परिसरात करण्यात आली.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुमारे 50 ते 60 माओवादी घातपाताच्या उद्देशाने त्या भागात जमले होते. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सि- 60 दलाच्या आठ पथकासह सीआरपीएफ च्या 37 बटालियन ची "ए" कंपनीने संयुक्तपणे शोध मोहीम राबवली व 19 मे रोजी सकाळी बिनागुंडा गावात सीताफिने घेराव घालून शोध घेतला असता, काही संशयित व्यक्ती हत्यारासह सापडल्या.गावात सामान्य नागरिक असल्याने गोळीबार टाळून पोलिसांनी पाच माओवाद्यांना जिवंत ताब्यात घेतले.तपासांती - मुंगी मंगरू होयाम उर्फ सुमली (डीव्हीसीएम,) पल्लवी केसा मिडीयम उर्फ बंडी (पीपीसीएम), देवे केसा पोडियाम उर्फ सबीता,(सदस्य) तसेच इतर दोन प्लाटून सदस्य उंगी व पल्लवी यांना अटक करण्यात आली. यांच्यावर अनुक्रमे सोडा व आठ लाखाचे तर देवे कोसा ओडियम वर चार लाखाचे बक्षीस होते उर्वरित दोघांवर मिळून आठ लाखांचे बक्षीस जाहीर होते. यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून इतर दोन संशियतांच्या वयाबाबत खात्री नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे.या कारवाईदरम्यान काही माओवादी जंगलाचा फायदा घेत पडून जाण्यात यशस्वी झाले.पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यानंतर माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आहे. सदर यशस्वी कारवाही विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उप महानिरीक्षक अजय शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सी- 60 दल व सीआरपीएफ च्या संयुक्त पथकाने ही कामगिरी पार पाडली.विशेष महत्त्वाचे- जानेवारी 2022 पासून तर आजपर्यंत एकूण 103 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले आहे हे विशेष.