मोर्शी येथे भव्य नेत्र तपासणी,औषधोपचार व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले

प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी
अमरावती:आज दिनांक २५ मे २०२५ रोजी, राम मंदिर, सरकारी दवाखाना (मोर्शी) येथे भारतीय जनता पार्टी,महात्मे आय बँक अँड आय हॉस्पिटल, नागपूर व आशा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क नेत्र तपासणी,औषध व चष्मा वाटप,मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा तसेच इतर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला मोर्शी व इतर परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया, मोफत औषधे व चष्मे वाटप, तसेच इतर आजारांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. निवड झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.या उपक्रमात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आशा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग घेतला. हे आरोग्य शिबिर मोर्शी व इतर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक ठरले.