हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची खा. डॉ.नामदेव किरसान यांनी केली प्रकृतीची पाहणी

Sat 17-May-2025,06:11 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली 

आरमोरी- तालुक्यातील मानापूर येथे दवंडी परवाडी मागें दोनच हत्तीचा कळप चक्क गावातच सिरले असता नागरिक हत्तीला गावाबाहेर हाकलून लावण्याकरीता एकच गर्दी जमली होती. दि ११ मे सकाळी च्या ६ चे सुमारास हत्तीचा कळपातील दोन हत्ती मानापूर गावात शिरले व त्यांनी वृद्ध महिला इंदिरा सहारे ६७ हिला सोंडाने बाजुला फेकले. गंभीर जखमी झाली असता हत्ती मानापुरच्या डोंगराच्या दिशेने गेलेत. प्रथम खा.डॉ.नामदेवराव किरसान मानापुर ला हत्तीच्या कळपाची माहीती घेण्यासाठी नागरीकांना भेटायला जात असतांना आरमोरी वैरागड मार्गावरील ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने हतींचा शोध घेत असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेची माहिती घेउन मानापुर ग्रामपंचायतला भेट देऊन हत्तीच्या धुमाकूळी मुळे झालेल्या नुकसानाची सविस्तार माहिती सरपंच व गावकऱ्यांकडून खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी घेतली हत्तीचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या त्या नंतर जखमी महिलेला आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भारती करण्यात आले ची माहिती मिळताच त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याकरिता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. गंभिर जखमी महिलेची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी छाया ऊईके डॉ धात्रक यांना चांगला उपचार करण्याच्या सूचना केल्या उपजिल्हा रुग्णालयातील समस्या जाणल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे,जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम,अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले तुकाराम वैरकार सरपंच मयुरी पेन्दाम रामभाऊ हस्तक दिवाकर पोटफोडे आनंदराव राऊत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.