एकोप्याने व एकनिष्ठेने शिवसैनिकांनी कार्य करावे :जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव यांचे आवाहन

Fri 16-May-2025,02:54 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श 

वर्धा:उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील पदाधिकारी आढावा बैठक विधानसभा क्षेत्र निहाय पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद सत्ताधारी पक्ष सध्या आर्थिक प्रबळता दाखवून नागरिकांची आणि सामान्य कार्यकर्त्यांची दिशाभूल करीत आहे. कार्यकर्त्यांना पक्षातून फोडण्यासाठी प्रयत्नरत आहे.तर पक्षातर्गत वादविवाद लावल्या जातं आहे.सत्ताधारी पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी शिवसैनिकांनी एकोप्याने व एकनिष्ठेने कार्य करण्याची गरज आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव यांनी केले.उध्दव बाळासाहेब शिवसेना पक्षातील विधानसभा क्षेत्र निहाय पदाधिकारी आढावा बैठकित ते बोलत होते.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पश्चिम विदर्भ संपर्क नेते खा.अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनात वर्धा, हिंगणघाट,पुलगाव येथे जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सह- संपर्क प्रमुख सिताराम भुते, जिल्हा प्रमुख आशीष पांडे, आर्वी, देवळी विधानसभा जिल्हा प्रमुख राजु खुपसरे,वर्धा,हिंगणघाट विधानसभा निहाल पांडे, उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे,उपजिल्हा प्रमुख व माजी राज्यमंत्री अशोक शिंदे,कामगार नेते विलास ढोबळे,श्रीधर कोटकर यांचे प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.या बैठकीला पक्षातील मुख्य प्रश्न पक्षाच संघटन वाढवणे व नगर परिषद नगरपंचायती,ग्रामपंचायती निवडणूकीबद्दल चर्चेला विषयी चर्चा करण्यात आली.तर शिवसैनिकांना आगामी निवडणुकीची रणनीती आखत सामान्य जनतेसाठी कार्य करावे. असे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हायतील असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.