स्वर्गीय डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृती पीत्यर्थ उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले

Tue 27-May-2025,12:08 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:बल्लारपूर शहरातील मुलांमुलीकरिता विसापूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे 1 मे ते 25 मे पर्यंत समर कॅम्प/उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बल्लारपूर शहरांमधील सामान्य घरच्या मुलांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये शहरातील 450 मुलांमुलींनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली असून त्यांना 25 विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण हे त्या त्या खेळाच्या परिक्षाकडून देण्यात आले.याच शिबिराचे समापन कार्यक्रमाचे आयोजन हे बल्लारपूर शहरातील दादाभाई नौरोजी वॉर्ड येथील स्व. सुषमा स्वराज सभागृहाच्या पटांगणात करण्यात आले होते. समापन सोहळ्या मध्ये माझे गुरुवर्य,माझे आदर्श, माझा अभिमान, आपल्या विधानसभा क्षेत्राचे सदस्य लोकनेते डॉ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षते खाली हा समापन सोहळा पार पाळण्यात आला. या समापन सोहळ्यामध्ये मुलांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपले योगदान दिले. अशा मुलांना डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व लहान मुलांनी शिबिरामध्ये मध्ये ज्या ज्या गोष्टीत शिकल्या. त्या त्या गोष्टी भाषा असो वा डान्स प्रत्येक विभागातील शिबिरामधील मुलांनी प्रात्यक्षिक अध्यक्षस्थानी असलेले डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष करून दाखविले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,खेळाडूचा सत्कार, व त्यांना ज्या परीक्षकाने त्यांना शिकविले त्या त्या परीक्षाकाचा सुद्धा सत्कार आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे माझे गुरु व माझे आदर्श माझा व अभिमान,आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा स्वागतासाठी जेसीबी वर चढूनत्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करण्यात आला. व त्यांना सुंदर अशी वाघाची प्रतिकृती आमच्या सुधीर मुनगंटीवार यांना देऊन सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर या संस्थेद्वारे सत्कार करण्यात आला. या समापन सोहळ्यामध्ये संस्थेचे सर्व सदस्यगन प्रामुख्याने उपस्थित होते.