कृषी पंप प्रलंबित विज कनेक्शन शेतकऱ्यांसाठी देसाईगंज येथे आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली दि.१ जून ला आढावा बैठक

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी - आरमोरी देसाईगजं कुरखेडा कोरची धानोरा तालुक्यातील धान पिकाची शेतजमीन आहे. सध्या पाण्याच्या पातळीचा स्तर खूप खोलवर गेल्यामुळे सोलर पंप कार्यक्षमतेने काम करत नाही. यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा योग्य रीतीने होऊ शकत नाही, तसेच जिल्हात हत्तीच्या कळपाचे वावर असल्यामुळे जंगल नदि नाल्यांवर लावलेले सौरऊर्जा सौलर पंप तुटुन शेतकऱ्यांची मोठी हाणी होतो परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतें तसेच सोलर पंप पाण्याचा पुरेसा उंचीपर्यंत पुरवठा करण्यात असमर्थ ठरत असल्याने, सोलर पंप योजनेऐवजी ज्या शेतकऱ्यांना विद्युत पंप पुरवठा मिळण्यासाठी विज वितरण डिमांड भरले असेल किंवा डिमांड साठी अर्ज केला असेल असे शेतकऱ्यांनी दिनाक १ जुनला दुपारी १२ वाजता आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली देसाईगंज येथील सिंधी भवन येथे बैठक आयोजित करण्यात येत आहे तरी अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन कुरखेडा आरमोरी देसाईगंज कोरची धानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे.