शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेकडून (उबाठा) सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा शिवसेना बल्लारपूरतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस मोठ्या उत्साहात व जनसेवेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना बल्लारपूर उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी समाजोपयोगी उपक्रमांतर्गत दोन्ही पायांनी अपंग असलेल्या नागेश पीपरीवार यांना बॅटरीवर चालणारी ट्रायसायकल प्रदान करण्यात आली. तसेच बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व अल्पोपहार वितरित करण्यात आले. नंतर पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमात उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा कल्पना गोरघाटे, तालुका प्रमुख प्रकाश पाठक,शहर प्रमुख बाबा शाहू, महिला आघाडी तालुका अध्यक्षा मिनाक्षी गलगट, आरोग्य सेना जिल्हा समन्वयक नरसिंग मादर, महिला आघाडी शहर अध्यक्षा ज्योती गेहलोत, शहर उप प्रमुख शेख युसुफ, माजी नगरसेवक सागर राऊत, रामू मेदरवार, गौरव नाडमवार, आनंद हनमंत्तू, बॉबी कादासी, कार्यक्रम संयोजक सुधाकर पोपले, सोनू श्रीवास, रोहित सरोज, शिव बानोत, शारदा अक्का, किरण जुनघरे, गुड्डी बहुरिया, अहमद अली, पीर गुलाम, रामचंद्र बेनी, मल्लेश अण्णा सह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.