भारतीय जनता पार्टी तालुका सालेकसा ची विस्तारित सभा संपन्न

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
मोदी जी के साथ मन कि बात कार्यक्रम
सालेकसा तालुका कार्यकारिणी व विविध आघाडी व युवा मोर्चाचे कार्यकारिणीचा विस्तार
सालेकसा-आज दिनांक 27/07/2027 रोज रविवारला सालेकसा तालुका भाजपा मंडळ तर्फे विस्तारित सभेचा आयोजन करण्यात आला असून मोदी जी के साथ मन कि बात हा कार्यक्रम घेऊन यावेळी समस्त भाजपा मंडळाची कार्यकारिणी, सर्व आघाडी, मोर्चा यांचा विस्तार करून सर्व पदाधिकारी यांना जवाबदारी देण्यात आली असून तालुका अध्यक्ष देवराम चुटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली असून सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष सीता रहांगडाले, आमगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार व माजी प्रदेश सचिव भाजपा संजय पुराम, माजी आमदार व उपाध्यक्ष को. बँक भेरसिग नागपुरे, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, माजी तालुका अध्यक्ष गुणवंत बिसेन, माजी तालुका अध्यक्ष कपूरचंद अग्रवाल,प.स. सदस्य अर्चना मडावी, जिल्हा महिला महामंत्री प्रतिभा परिहार, जिल्हा अनुसूचित महामंत्री राजेंद्र बडोले, जेष्ठ पदाधिकारी राजु येटरे,माजी जि.प. सदस्य कल्याणीताई कटरे, माजी सदस्य प्रेमलता दमाहे, जिल्हा युवा मोर्चा सचिव टिकेशजी बोपचे,माजी प.स. सदस्य संगीता शहारे, व भाजपा तालुकाचे समस्त आजी,माजी तालुका कार्यकारिणीचे, आघाडी चे अध्यक्ष,महामंत्री, उपाध्यक्ष,बूथ अध्यक्ष, वरिष्ठ मार्गदर्शक, व अन्य आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्तितीत होते, यावेळी सर्व कार्यकारिणी चा विस्तार करून यादी प्रकाशित करून सर्व नवनियुक्त पदाधिकारी,कार्यकर्ते यांना संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली असून त्याना पत्र देण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन संघटनेची जबाबदारी पूर्ण करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.