विदेशी स्थलांतरीत पाहुण्या पक्ष्यांचे संरक्षण वन उद्यान दुर्लक्षित

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी - गडचिरोली जिल्ह्यात पक्ष्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विदेशी स्थलांतरीत पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. मागील ४८ वर्षांपासून वघाळा येथे आगमन होण्याची परंपरा पक्ष्यांनी यावर्षीही कायम ठेवली आहे. विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. पाहुण्या पक्ष्यांच्या स्वागत, संवर्धन व संरक्षणासाठी सज्ज राहत असताना. वघाळा येथे एप्रिल ते मे महिन्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन झाले आहे हे पक्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात निघून जातात. वघाळा गावात सुमारे ४७ चिंचेची मोठी झाडे आहेत. या झाडांवर विविध जातींचे विदेशी पक्षी वास्तव्य करतात. यावर्षी करपोचा ओपन बिल, स्टॉर्क, राईट आयबीस, पेंटेड स्टॉर्क, ब्लॅक कार्मोरन्ट, कॅटल, इविग्रेट, लिटल कार्मोरन्ट, कॅटल ईग्रेट, चेस्ट नट, बिटन अशा विविध जातींच्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. वघाळा येथे पक्षांसाठी पोषक वातावरण आहे. नदीमध्ये मिळणारे खाद्य, पाणी व वघाळावासीयांकडून मिळणारे विशेष संरक्षण यामुळे वघाळा हे गाव विदेशी पक्ष्यांसाठी पोषक ठरले आहे. दरवर्षी पक्ष्यांची संख्या वाढत आहे. विदर्भात सर्वात जास्त स्थलांतरीत विदेशी पक्षी वघाळा येथे येतात. त्यामुळे या गावात पक्षी पाहण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक वन्यजीवप्रेमी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु पाऊस सुरु झाल्यामुळे काही पक्षी झाडांवरुन खाली पडून मरण पावतात, तर पक्ष्यांच्या विष्ठेमुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन गावातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वघाळा येथे स्थापन करण्यात आलेल्या वन्यजीव पक्षी संरक्षण समिती, वघाळा जुना याकडे नागरीकानी सांगितले असता समितीनी या विषयांवर टाळाटाळ केली. दरवर्षी साफसफाई करण्यासाठी एक मजुर कामाला असे, परंतु यावर्षी अदयापही मजुराची निवड करण्यात आलेली नाही.या समधी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वारंवार पत्र व्यवहार केला परंतु गावकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखऊन ना देखभालीसाठी निधी उपलब्ध दिला ना वनमजूर दिल्याने स्थानांतरीत विदेशी पक्षाच्या विटेमुळे गावात दुर्गंधी पसरुण नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची समस्या आमदार रामदास मसराम यांनी वघाळा जुना येथील पक्षी संरक्षण वन उद्यानाला अचानक भेट देऊन पाहणी दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले. यात मोठा प्रमाणात शासनाच्या वतीने खर्च करण्यात आले परंतु या ठिकाणी एकही वनमजूर देखभालीसाठी नसल्यामुळे एवढ्या चांगला वन उद्यान पुणता दुर्लक्षित असल्याचे पाहणी दरम्यान दिल्याने यांची दखल घेऊन आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी राज्याचे वनविभागाचे सचिव मिलीद म्हैसकर यांच्या कडे तातडीने वघाळा येथील पक्षी सरक्षण वन उद्यानास दोन वनमजुरासह निधी व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे यावेळी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम धनपाल मिसार सर सरपंच मिथुन प्रधान रामदास दोनाडकर शरद प्रधान लोमेश दोनाडकर अरुण ढोरे धनराज दोनाडकर अविनाश दोनाडकर अनाजी लिगायत सुचित अवसरे चंद्रकांत दोनाडकर पारस ढोरे सुजल दोनाडकर सुरज दोनाडकर विलास प्रधान संतोष प्रधान सुधाकर अनोले शकील ढोगे करण दोनाडकर निकेश दोनाडकर सतिश दोनाडकर महेश दोनाडकर मनोज पिलारे खेमराज दोनाडकर लकेश प्रधान यांसह अन्य नागरिक उपस्थित होते.