महामार्ग ओलांडून शेतात वाघाचा प्रवेश, परिसरात भीतीचं वातावरण

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
गोंदिया:आमगाव ते देवरी मार्ग अंजोरा-रामपुर परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 543 वर गुरुवारी दुपारी 12 वाजता एका वाघाने महामार्ग ओलांडून शेजारच्या शेतात प्रवेश केल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली असून,गोंदिया व नागपूर येथून विशेष रेस्क्यू पथक दाखल झाले आहे.केवळ आठवड्याभरापूर्वीच येरमडा-सोनेखारी परिसरात एका गोऱ्यावर वाघाने हल्ला केला होता. दोन्ही घटना एकाच वाघामुळे घडल्या की नाही, याचा तपास सुरू आहे.परिसरात दहशतीचं वातावरण असून, वनविभाग सतर्क झाला आहे. अधिकारी ए. एच. सोनटक्के यांच्या नेतृत्वात गस्त वाढवण्यात आली असून, नागरिकांना जंगलाजवळ गुरे चारणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.वनविभागाकडून सतर्कतेचे निर्देश देत सांगण्यात आले की, "वाघ आढळल्यास त्वरित कळवा; विभाग सज्ज आहे."रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, पुढील धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
Related News
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा तालुका द्वारे फळ वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रम
22-Jul-2025 | Sajid Pathan
आपत्ती व्यवस्थापनासाठी ब्रम्हपुरी तालुका प्रशासन सज्ज-तहसीलदार सतीश मासाळ
09-Jul-2025 | Sajid Pathan
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रकल्पालाच लागलेय घाणीचं ग्रहण! – दोन वर्षांपासून अपूर्ण प्रकल्पामुळे संतप्त नागरिक
07-Jul-2025 | Arbaz Pathan
२४ तास पाणीपुरवठा करा, अन्यथा वार्षिक सरासरी आकारणी करा:अन्यथा वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा
18-Jun-2025 | Sajid Pathan