झिंगाणूर पोलिसांनी जपली माणुसकी श्रमदानातून बनवले नाल्यावर पुल

Wed 30-Jul-2025,04:49 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

गडचिरोली:सिरोंचा तालुक्यापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेले उप पोलीस स्टेशन हद्दीतील नदी,नाले, डोंगर, घनदाट जंगलामध्ये वसलेले अति दुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी बहुल झिंगानूर हे गाव अनेक दशकापासून मूलभूत सुविधा पासून वंचित आहे व अनेक समस्यांना तोंड देत आहे.झिंगानूर हे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात पसरले आहे. झिंगाणूर गावचा एक भाग असलेले लिंगापूर टोला या गावचा पावसाळ्यामध्ये नाल्या मध्ये खूप पाणी असल्याकारणाने इतर गावाशी संपर्क तुटतो त्यामुळे वैद्यकीय मदत मिळत नाही व शेती मध्ये ही जाता येत नाही व शालेय विद्यार्थी हे शाळेमध्ये न जाऊ शकल्यामुळे यांचे शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत आहे.वरील समस्येची दखल घेऊन लिंगापूर टोल्या मधील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यासाठी गडचिरोली चे मा. पोलीस अधीक्षक निलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक(अभियान) एम.रमेश,अपर पोलिस अधीक्षक(प्रशासन) गोकुळराज जी , अपर पोलीस अधीक्षक (प्राणहिता) सत्यसाई कार्तिक , उप विभागीय पोलिस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन झिंगानूर चे प्रभारी अधिकारी पोउपनि अभिजीत घोरपडे व पोउपनि अनिकेत खोपडे, पोउपनि ओंकार हेगडे तसेच जिल्हा पोलिस अंमलदार व SRPF गट कोल्हापूर व SRPF गट अमरावती चे अंमलदार यांनी अभियान दरम्यान लिंगापूर टोल्याची समस्या जाणून झिंगानूर पोलिसांनी पुलाचे बांधकाम हाती घेऊन काही तासांमध्ये श्रमदानातून नाल्यावर पूल तयार केला त्यामुळे तेथील लोकांना कितीही पाऊस आला किंवा पूर आला तरी सहज दवाखान्यांमध्ये व शेतीमध्ये जाता येईल व शालेय विद्यार्थ्यांना शाळे मधे जाऊन शिक्षण घेता येईल. अशा झिंगानूर पोलिसांच्या कामगिरीमुळे गडचिरोली पोलिस दलाचे कौतुक होत आहे व लोकांच्या मनामध्ये गडचिरोली पोलिस दलाबाबत आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.