दगडांचा ढिगारा मुख्यमार्गांवर टाकल्याने वाहतूक ठप्प

Wed 30-Jul-2025,04:58 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा तीर्थक्षेत्राला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 49 वर गेल्या एक आठवड्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागा कडून रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठाल्या दगडांचा ढिगारा टाकून ठेवल्याने या मार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांसह संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने ठेकेदारावर कारवाई करुन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आजनसराचे माजी सरपंच श्रावण काचोळे विश्वहिंदू परिषदचे वडनेर प्रखंड अध्यक्ष डॉ. संदीप लोंढे यांनी केली