आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून शहरात ४५ हातपंपसाठी ७० लाखांचा निधी मंजूर

Thu 22-May-2025,06:04 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर:उन्हाळ्याच्या दिवसात चंद्रपूर शहरातील अनेक प्रभागांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. काही भागांमध्ये पाण्याचा पुरवठा कमी होतो, ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत,४५ नवीन हातपंप उभारण्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे शहरातील पाणीटंचाईग्रस्त प्रभागांना प्राधान्य देऊन हातपंपांचे स्थान निश्चित करण्यात आले आहे.संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हातपंप उभारणीचे काम दर्जेदार,जलद व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे.पाणी हा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या तक्रारी सातत्याने येतात. म्हणूनच ७० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर करून ४५ हातपंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही कामे लवकरच सुरू होतील आणि नागरिकांना याचा थेट लाभ मिळेल.शहरात गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदल, भूजल पातळीतील घट, आणि लोकसंख्येचा वाढता ताण यामुळे पाण्याची मागणी वाढत गेली आहे.या पार्श्वभूमीवर हातपंपासारख्या तात्काळ व कार्यक्षम उपाययोजना अत्यंत गरजेच्या बनल्या आहेत.हातपंप मुळे निगरिकांना घराजवळच पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. अमृत योजने अंतर्गत नळ जोळणीचे काम काही भागात पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम दुस-या टप्यात सुरु आहे. यंदा पाणी टंचाईवर नियंत्रण आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. यंदा ब-यापैकी आपण पाणी पूरवठा सुरठीत ठेवण्यात मनपा प्रशासनाने प्रयत्न केले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले आहे.