पक्ष संघटना वाढविण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेसची तालुकास्तरीय बैठक संपन्न

Tue 27-May-2025,11:48 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगांव : आज आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अत्यावश्यक बैठक पक्षाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानास गती देण्यासाठी गावपातळीवर बुथस्तरावर, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अधिकाधिक लोकांना पक्षाशी जोडता येईल आणि पक्ष संघटन अधिक बळकट होईल. यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर कार्यकर्त्यांच्या समित्या देखील गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी म्हाडा सभापती नरेशकुमार माहेश्वरी, जि.प.गोंदियाचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार आणि महिला जिल्हा उपाध्यक्षा कविता राहांगडाले यांनी मार्गदर्शन केले.सभेला उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रामुख्याने नरेश कुमार माहेश्वरी सुरेश हर्षे कमल बापू बहेकार, टिकाराम मेंढे,राजेश भक्तवर्ती,रविंद्र क्षिरसागर, सीमा शेंडे, कविता राहांगडाले, लक्ष्मी येडे,उषा डोंगरे, सुनील ब्राह्मणकर, प्रमोद शिवनकर,संतोष श्रीखंडे, प्रल्हाद वंजारी, हरिचंद्र फुंडे, विनोद कन्नमवार, गिरी महाराज, महेंद्र राहांगडाले, स्वप्नील कावळे,सुमित कन्नमवार, आनंद शर्मा, तुकडोदास राहांगडाले, जयप्रकाश पटले, शामराव ठाकरे, देवराव बिसेन, यादवराव बिसेन, कमलेश बहेकार, दिलीप वैरागडे,अशोक कटरे,धनराज बोपचे, डाॅ. हरिणखेडे, हरिचंद्र राहांगडाले, आनंद पटले, राधेश्याम उके, नागोराव सोनवणे, मोहनलाल पटले, श्यामदास बारा पात्रे, होलीराम राहांगडाले, सौरभ डोंगरे, ऋषभ शर्मा, ललित ठाकूर, प्रकाश वंजारी, चंद्रपाल राहांगडाले, लखन भलावी, रमणलाल डेकाटे, पुरुषोत्तम चुटे, नरेंद्र कुमार बिसेन, नामदेव दोनोडे,पंचम मानकर,शैलेश बहेकार,धनराज बोपचे,उरकुडा अंबुले,मुलचंद गायधने,उमेश मेश्राम यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.