आरमोरी आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 77 वा वर्धापन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी -: आरमोरी आगाराचे 1995 मध्ये पालकमंत्री गजाननराव कीर्तिकर यांचे हस्ते आरमोरी आगार चे उदघाटन सोहळा पार पडला होता.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ च्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त रणजित बनकर पत्रकार व राजेश राठोड आगार प्रमुख अधिकारी मरापममं आरमोरी यांनी सर्व प्रवासी व चालक वाहक आणि कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व पेढे भरवुन वर्धापन दिना च्या शुभेच्छा देत 77वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी रणजित बनकर म्हणाले की,आरमोरी शहरात दिवसेंदिवस वर्दळ वाढली होती.तसेच जुने बसस्थानक परिसरात वाहनांची गर्दी होत होती.यामुळे प्रवासी वाहतूकीला तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.यातूनच प्रवाशांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी आरमोरी बसस्थानक निर्माण झाले.आजतागायत काही सुविधा उपलब्ध जरी नसल्या तरीपण बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर आहे.तसेच भविष्यात ज्या ज्या सेवांची इथे आवश्यकता आहे.त्या सेवांची पुर्तता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ करेल असा आशावाद बाळगण्यास हरकत नाही. असेही ते म्हणाले.बसस्थानक सेवेतील कर्मचारी,आगार व्यवस्थापक व प्रवाशांना शुभेच्छा देत यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.वर्धापन दिनाच्या कार्यक्रम ला रणजित बनकर, राजेश राठोड, संकेत क्षीरसागर, मनोज कावळे कर्मचारी, विकास कोवे चालक,राजु जुमळे वाहक, पुष्पा भोयर, भाऊराव भोयर, विक्की कुंभारे,विशाल कुकडकर,विशाल लटारे व इतर प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.