साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी

प्रतिनिधी:मंगेश लोखंडे (हिंगणघाट)
दि.01/08/2025 शुक्रवारला साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती निमित्त विर भगतसिंग वार्ड, हिंगणघाट येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बॅंडपथक, धुमालच्या गजरात मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा काढून साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी मा.श्री.आमदार समीर कुणावार, डॉ.निर्मेश कोठारी,शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख राजेश हिंगमिरे, तालुकाप्रमुख अमित गावंडे,शहरप्रमुख सुनिता तांबोळी,उपशहरप्रमुख कुलभूषण वासनिक,युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश काटकर,शहरसंघटक सोनू लांजेवार, विभागप्रमुख सतिश तांबोळी व समस्त शिवसैनिक तसेच त्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून वार्डातील समस्त नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थितांना आमदार कुणावार व कोठारींनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करतांना विशेष मदत करत राहू असे आश्वासित केले...