शेतकऱ्यांचे हित सोपासणे आद्य कर्तव्य - भेरसिंग नागपुरे

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
आमगाव: ग्राम कालीमाती येथील दि. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक येथे महसूल दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी सत्कारमूर्ती बँकेचे उपाध्यक्ष भेरशिंह नागपुरे,संचालक विनोद कन्नमवार,भाजपचे जेष्ठ नेते सुखराम महारवाडे, सरपंच शिला पुरसोत्तम चुटे,जि.प.सदस्य किशोर महारवाडे,शाखा व्यवस्थापक मिलिंद बिसेन,शाखा निरीक्षक राजकुमार लांजेवार, दुतीय श्रेणी अधिकारी सुमेध हुमणे,रोखपाल प्रकाश हरिनखडे,समाज सेवी यशवंत मानकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सेवकराम ब्राम्हणकर,तालुका अध्यक्ष बाळा बिसेन,विकास महारवाडे,यवराज पटले, बंडू दोनोंडे, विदयासागर पारधी, श्रीराम पाथोडे, विनोद चुटे, सेवा सहकारी संस्थेंचे संचालक राजीव हेमराज फुंडे प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी नागपुरे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे आणि गट सचिव यांच्या मागण्यासाठी सहकार मंत्री यांच्या कडे पाठपुरावा करणार तसेच बँकेकडून शेतकरी आणि खातेदार हे आपले दैवत आहेत त्यांना त्रास होणार नाही या विषयी कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष देण्याची सूचना केली.कार्यक्रमाचे संचालन पत्रकार राजु फुंडे व आभार प्रदर्शन श्यामलाल दोनोंडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट सचिव पी ए मेश्राम, रामेश्वर महारवाडे,जगदीश मानकर, नरेंद्र कुकडीबुरे आदींनी परिश्रम घेतले.