अवैध दारूविरुद्ध मोठी कारवाई ३३ हजार रुपयांची दारू जप्त एकाला अटक एक फरार

Sat 09-Aug-2025,09:13 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूरमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्रीविरुद्ध मोठी कारवाई करत ३३ हजार रुपयांची देशी दारू जप्त केली. यादरम्यान, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसरा फरार झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एका खबऱ्याकडून अल्लीपूरमधील आठवडी बाजारात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून नवनियुक्त ठाणेदाराच्या माहितीच्या आधारे,महिला पीएसआय वर्षा तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने अल्लीपूरमध्ये छापा टाकला. कारवाईदरम्यान, आरोपी सौरभ सुरकार(रा. अल्लीपूर) याला अटक करण्यात आली, तर नाझीम शकील कुरेशी (रा.अल्लीपूर) फरार झाला आहे पोलिसांनी घटनास्थळावरून २८,८०० रुपयांच्या देशी दारूच्या (प्रत्येकी १८० मिली) १४४ बाटल्या आणि ४,२०० रुपयांच्या गावठी मोहा दारू २० लिटर जप्त केली.जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ₹३३,००० इतकी आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन,अतिरिक्त पोलिस अधीक्षक वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखले यांनी केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस पथकात अजय रीठे, गणेश आव्हाड आणि निखिल वासेकर यांच्यासह पीएसआय वर्षा तेंडुलकर यांचा समावेश होता.अटक केलेल्या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.