वर्धा जिल्ह्यात भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा.

Mon 11-Aug-2025,09:31 PM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा :वर्धा येथील आखरे मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा साळी समाज मंडळातर्फे आद्यवस्त्र निर्माते, शिवपुत्र भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सर्व समाज बंधू भगिनी यांच्या उपस्थिती मध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाज बांधव प्रकाश कडू, उपाध्यक्ष प्रणाली लव्हाळे, प्रमुख पाहुणे बृहन्मुंबई येथे स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत असलेले आशिष इंगळे,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातून सेवानिवृत्त अभियंता प्रकाश मिरगे,सेवानिवृत्त भारतीय सैन्यदल अधिकारी प्रल्हादराव कोठेकर,सेवानिवृत्त बँक शाखाव्यवस्थापक पांडुरंग शिंगणे,लीना मिरगे, प्रल्हादराव साळी,रजनी साळी, ज्ञानेश्वरराव जारी, सेवानिवृत्त प्राध्यापक मनोहर पिंपळे,सेवानिवृत्त बँक ऑफ इंडिया चे शाखाव्यवस्थापक प्रकाश बुरांडे, माजी नगराध्यक्षा वर्धा दीपीका आडेपवार, म रा वी वी मध्ये कार्यरत असणारे अभियंता सुरज क्षीरसागर, प्रशासन अधिकारी सामान्य रुग्णालय भंडाराचे अशोकराव चपटे, विष्णुपंतजी बोन्द्रे, आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्याच्या हस्ते भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या फोटो चे पूजन, हारार्पण, द्विप्रज्वलन आणि आरती करण्यात आली. यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुछ शाल श्रीफळ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा मनोहर पिंपळे यांनी केला.साधना कोठेकर यांनी भगवान जिव्हेश्वर जन्म कथा सार चे वाचन केले.यानंतर विध्यार्थी गुणगौरव कार्यक्रमध्ये 12 वी उत्तीर्ण स्वर्णिम सुरेंद्र लव्हाळे,सलोनी राजेश कोठेकर तर 10 वी तील शौर्य अजय इटकिकर,देवांशी पंकज मांडवगणे या विध्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक व्यतिरिक्त इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तींचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये भावना अजय इटकीकर यांचा "माझा सख्यारे" हा कविता संग्रह प्रकाशित झाल्याबद्दल, राहुल वकारे यांना 'महाराष्ट्र पक्षी मित्र' तर्फे पक्षी जनजागृती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.सुरेंद्र लव्हाळे सर यांनी वर्धा जिल्हा परिषद चे माझी सि ई ओ यांना मराठी विषयांचे धडे देऊन त्यांना मराठी शिकविण्यात मौलाचा वाटा उचलला ही सुरेंद्र सोबत सर्व समाजासाठी गौरवाची बाब होती याबद्दल सुरेंद्र लव्हाळे यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच चि अवनीश प्रवीण जारी या विध्यार्थ्याने अबॅकस स्पर्धेत सुवर्ण पदक, कु आराध्या प्रितेश चपटे हिला महाराष्ट्रातून अबॅकस मध्ये दुसरा क्रमांक, कु स्वानंदी प्रितेश चपटे हिला वर्धा जिल्ह्यातून अबॅकस स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल तर 10 व्या वर्गात शिकणारा इशांत मिलींद भागवत याने एकलव्य शिष्यवृत्ती परीक्षेत सत्तर हजार रुपयाची शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल या सर्व विध्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये चित्रकला स्पर्धा, नृत्यस्पर्धा, वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.यानंतर पाहुणे प्रल्हादराव कोठेकर, ज्ञानेश्वरराव जारी,लीना मिरगे, वर्धा माजी नगराध्यक्षा दीपीका आडेपवार यांची भाषणे झाली. प्रमुख पाहुणे प्रकाशराव मिरगे,आशिष इंगळे,कार्यक्रमाच्या उपाध्यक्षा प्रणाली लव्हाळे यांची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणातून प्रकाश कडू यांनी समाजातील विविधता आणि कार्य यावर प्रकाश टाकला. भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव निमित्य समाज बांधव श्री रत्नाकदादा जोगे यांच्या प्रयत्नातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये समाजातील बंधू भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. यानंतर महिलांसाठी विशेष कार्यक्रम 'जिंका पैठणी' या सदरामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वाती मिलींद भागवत,लीना प्रकाश मिरगे यांनी उत्तम खेळ करून पैठणी जिंकल्या.पुरुषांच्या खेळमध्ये संदीप जारी यांनी प्रथम पुरस्कार मिळविला.कार्यक्रमाचे संचालन अश्विनी शिंगणे,शिल्पा खंडारे, साधना कोठेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेंद्र लव्हाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दत्तात्रय दिवटे, मिलिंद भागवत, संजय टेकाळे, प्रितेश चपटे, रत्नाकर जोगे, संजय शिंगणे, कृष्णा ताठे, प्रशांत वकारे,रत्नदीप इंगळे, वैभव सरोदे,चंद्रकांत खंडारे, अमोघ वकारे, वैभव दिवटे,पंकज लव्हाळे,सिंधु दिवटे, संगीता टेकाळे,जयश्री बुरांडे, वर्षा जोगे,स्नेहा दिवटे,स्वाती भागवत, साधना कोठेकर, प्रीती जारी,प्रीती खंडारे, सोनल कोठेकर,योगिता वकारे, जयश्री वकारे, निकिता वकारे आदिनी परिश्रम घेतले.