माल्ही येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव
आमगाव : ग्राम माल्ही येथील जय सेवा समिती च्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमांची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या छायाचित्राला मालार्पण व सप्तरंगी झेंड्या चे पूजन करून करण्यात आली.या प्रसंगी अध्यक्षस्थानी राका महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता रहांगडाले, दीपप्रज्वलन से. नि शाखा व्यवस्थापक भोजराज वरखडे,अतिथी म्हणून से. नि. मुख्याध्यापक तेजराम वाढीवा,राकेश परतेती, हरिचंद उईके,सारिका मडावी,प्रशांत उईके, पंचांराम मडावी,जगन परतेती, उमेश रहांगडाले,गोकुल कोरे, संतोष कुसराम, मनोज पंधरे, दिगम्बर कोरे, राजीव फुंडे,कागदीमेश्राम, ताराचंद शेंडे, पो पा. सुरेश कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी गावात विधिवत शोभा यात्रा काढण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन सचिन धुर्वे तर आभार आनंद कोडापे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे जागेश मरकाम, गणेश मरकाम, ठानेंद्र कुसराम, तेजराम सय्याम, भोजराज सय्याम, सुदाम टेकाम, रेवन पंधरे, भुरू पंधरे, कमलेश्वर मडावी, भूमेश्वर मडावी, अनिल वरखडे, कमलेश कोडापे, सोनू उईके, काजल मरकाम,आचल मरकाम, शिरवंता मडावी,किरण मरकाम, अंजली सय्याम, ममता मडावी, प्रमिला मडावी, महिमा धुर्वे,निलेश कोडापे गीता मसराम आदींनी परिश्रम घेतले.