अल्लीपूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक

Wed 13-Aug-2025,12:26 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपुर 

वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर ठाणेदार विजय घुले यांची उपस्थिती होती. पोळा मिरवणूक उत्सव याविषयी ठाणेदार ठाणेदार विजय घुले यांनी सविस्तर माहिती दिली. गावामध्ये सामाजिक एकता राहावी या उद्देशाने शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोळा उत्सव मध्ये सर्वांनी शांतता पाळावी कायद्याच्या चकोरीतच राहून मिरवणूक काढावी अश्या सूचना दिल्या. शांतता समितीच्या बैठकी करीता गावातील माजी सरपंच नितीन चांदणखेडे,सतिश काळे विजय जयस्वाल,अशोक सूपारे,सचिन पारसडे व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.