श्री.किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथे शिक्षक पालक सभा संपन्न.

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:वैरागड येथील किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड येथे सत्रातील प्रथम पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पालक सभेत शिक्षक -पालक संघ गठीत करण्यात आला. शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष म्हणून रेवनाथ जीवन लाडे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी प्राचार्य डाँ. विवेक हलमारे यांची निवड करण्यात आली. सभेत विद्यार्थी सुरक्षा, गुणवत्ता, अध्ययन,करियर, परिवहन इ. विषयांवर विस्तृत चर्चा झाली.शिक्षक -पालक सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाँ. विवेक हलमारे, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सदस्य प्रा. धर्मेंद्र जणबंधू, प्रा. बन्सोड, पालक महादेव दुमणे होते. यावेळी प्रास्ताविक प्रा. मनीष राऊत, संचालन प्रा. नरेश लाडे, तर आभार प्रा. अमोल नैताम मानले. पालक सभा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश म्हशाखेत्री, प्रा. चंद्रशेखर बर्वे, प्रा. दीपाली चांदेवार, निखिल पाटील, महेश बोदेले इ. अथक प्रयन्त केले. यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते.