दुचाकीच्या भीषण अपघात एकाचा मृत्यू : एक गंभीर जखमी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: चंद्रपूर - बल्लारपूर महामार्गावर सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भिवकुंड (विसापूर ) जवळील चंद्रपूर सैनिक शाळेजवळ सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.विशाल राजु कैथवास (२७), रा. संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर असे मृतक युवकाचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव सूरज शर्मा (२५), रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर, असं आहे.११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास विशाल कैथवास आणि त्याच्या भाऊ चा साला सूरज शर्मा हे चंद्रपूरहून बल्लारपूरकडे आपल्या पल्सर दुचाकी क्रं एमएच ३४ बीएक्स ८९८२ ने परत येत होते.चंद्रपूर सैनिक शाळा गेट समोरील महामार्गाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन डिव्हायडरला जोरदार धडकली.या अपघातात विशाल कैथवास याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तर सूरज याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले.पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.