प्राथमिक आरोग्य केंद्र अल्लीपूर येथे रिक्त पदे व सोई सुविधांचा अभाव

Mon 11-Aug-2025,07:44 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

वर्धा:प्राथमिक आरोग्य केंद्र अल्लीपूर येथे काही कर्मचारी पदे रिक्त असून सोयी सुविधांचा अभाव असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नाईक सर व वैद्यकीय अधिकारी डॉ.गजभिये मॅडम यांचे सोबत संपर्क साधून,आज चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रिक्त असलेली पदे,दवाखान्याची स्वच्छता,रात्रपाळीत असणारे कर्मचारी रेग्युलर करावे,रहिवाशी असलेल्या सहायक वैद्यकीय व इतर कर्मचारी यांच्या साठी असलेल्या कार्टरची स्वच्छताकरण,सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक बाहेर बोर्ड वर प्रकाशित करणे,औषधांचा तुडवडा होऊ नये याची खबरदारी व नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक उपचार पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात यावे अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या,प्रशाकीय येणाऱ्या अडचणी साठी आम्ही सोबत असू अशी ग्वाही सुद्धा यावेळी दिली.