बल्लारपूरमध्ये भंगार मालासह दोन जण अटकेत ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : सातनल चौकी हद्दीत पथकाने पाळत ठेव दरम्यान एका निळ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या चारचाकी वाहनातून परवान्याविना भंगार माल वाहतूक करणारे दोन जणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सुमारे ४ लाख ७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बालाजी रामचंद्र कोहले (४३), रा. वार्ड क्र. ०२, रामपूर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर व युनुस युसुफ अली (३३), रा. श्रीराम वार्ड, सवारी बंगल्या जवळ, बल्लारपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पथक ८ ऑगस्ट रोजी रात्री पायदळ पेट्रोलिंग करीत असताना सुमारे ८.१५ वाजता गांधी चौक ते गोल पुलीया रस्त्याने चार चाकी वाहन क्रं.एमएच ३४ एवी ००८२ जाताना दिसली. त्या वाहनाला गांधी चौक येथे अडवून तपासणी केली असता, जर्मन तार, लोखंडी पाइप, कुलर पत्रे, जुनी गॅस शेगडी आणि चिल्लर भंगार साहित्य असा साठा आढळून आला.लगेच पोलीसांनी वाहन चालक बालाजी रामचंद्र कोहले (४३), रा. वार्ड क्र. ०२, रामपूर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर, तर सोबतीचा इसम युनुस युसुफ अली (३३), रा. श्रीराम वार्ड, सवारी बंगल्या जवळ, बल्लारपूर यास ताब्यात घेऊन भंगार साहित्याबाबत बिल, पावती वा खरेदी-विक्री परवाना मागितला असता, आरोपींकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. वाहन चालकाने हा माल बल्लारपूर येथील भंगार विक्रेता इलीयास शेख याच्याकडे विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले.पोलीसांनी टाटा चारचाकी वाहन,जर्मन तार २५ किलो, लोखंडी पाइप ७५ किलो, कुलर, गॅस शेगडी आणि चिल्लर भंगार साहित्य असे एकूण ४ लाख ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.या प्रकरणी आरोपी बालाजी रामचंद्र कोहले व युनुस युसुफ अली यांच्यावर म.पो.का. कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोहवा मोहन निषाद, पो अं गुरू शिंदे, वैभव यांनी केले.