अल्पवयीन रणजित निषाद पाच दिवसांपासून बेपत्ता

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर:बल्लारपूरातील टिळक वॉर्ड येथील अल्पवयीन तरुण रणजित दिनेश निषाद गेल्या पाच दिवसांपासून राजुरा तहसील मधील गौरी सास्ती परिसरातील गुप्ता कोळसा वॉशरी वेकोली परिसरातून त्याच्या मित्रांसह रात्री फिरायला गेला होता आणि तो परतला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा कुटुंबीयांना संशय आहे. या संदर्भात मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे बेपत्ता मुलाचा शोध घेण्याची किंवा सीआयडी कडून प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी बेपत्ता मुलाच्या पालकांनी पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाला केली आहे.बेपत्ता अल्पवयीन मुलाची आई राजाराणी आणि वडील दिनेश यांनी सांगितले की, राजुरा तहसीलमधील बाबापूर, कढोली, मानोली कोलगांव येथील परिसराजवळ गुप्ता वॉशरी आणि वेकोली कोळसा खाणी आहेत, जिथे रात्रीच्या वेळी वाहतूक वाहनांमधून वाहनांच्या बॅटरी आणि डिझेलची चोरी अनेक वेळा होते. त्याचप्रमाणे, ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.3० वाजता, बल्लारपूर येथील टिळक वॉर्ड रहिवासी रणजित निशाद उर्फ कट्टाणी दिनेश निषाद वय १७, त्याच्या ७ मित्रांसह बाहेर गेला आणि परतला नाही. दरम्यान, दुसऱ्या दिवशी, रणजितसोबत गेलेल्या तरुणांना चोरीच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी अटक केली. त्यात रणजित निशाद त्यांच्यात नव्हता.परंतु त्याचा मोबाईल फोन दाऊद नावाच्या मुलाने राजुरा पोलिसांना दिला. या आधारे,रणजित सोबत गेलेल्या तरुणांनी त्याच्याशी काहीतरी चुकीचे केले आहे असा कुटुंबाचा संशय आहे.या संदर्भात,पोलिसांनी बेपत्ता मुलाला शोधून न्याय द्यावा किंवा सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.पत्रकार परीषदेला रणजितची आई राजाराणी, वडील दिनेश निशाद आणि भाऊ संजय निशाद,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलावर, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे,सुनील गुढे आणि इतर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.