दिवाळी सन आनंद, एकता आणि संस्कृतीचे प्रतीक-मोहन मोहिते

Sat 18-Oct-2025,09:43 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

सेंट थॉमस इंग्लिश मिडीयम, सत्याश्रम बोरगाव या शाळेत दिवाळी मिलन सोहळा संपन्न

वर्धा:बोरगाव मेघे भारतात धार्मिक उत्सवांचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू आहे. भारतीय सणांची उत्पत्ती, प्राचीन भारतीय संस्कृतीतील विविध धार्मिक पद्धती मधून झालेली आहे. सन हे आध्यात्मिक आणि धार्मिक आचरणाचे महत्त्वाचे भाग आहेत. जे लोकांना ईश्वरांशी जोडतात. प्रत्येक धर्माला आप आपले सण उत्सव आहे प्रत्येक प्रदेशाची स्वतःची परंपरा आहे. या परंपरांना शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे. दिवाळी हे अंधारावर प्रकाशाचा वाईट वाटेवर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करण्यामध्ये दिवाळी सण हे आनंद एकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन मोहिते मोहन मोहिते यांनी 18 ऑक्टोबर रोजी सत्येश्वर सभागृहात ते सेंट थॉमस इंग्लिश शाळेत आयोजित दिवाळी मिलन सोहळ्याच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे उपाध्यक्ष इमरान राही तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्या प्रीती सत्यम, साध्वी सत्यमित्रा, शाळेचे संचालक विजय सत्यम, उप मुख्याध्यापिका वर्षा देशपांडे, वेदांत सत्यम, संदीप जोशी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 

प्रीती सत्यम म्हणाले की आपल्या देशात वर्षभरात विविध सण साजरे केले जातात. यात दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण साजरा करताना भारत देशाची सांस्कृतिक ओळख प्रामुख्याने दिसून येते. याप्रसंगी इमरान राही यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सेजल सिंग व नितीन सिंग तर आभार प्रदर्शन रिजवाना शेख यांनी केले. 

याप्रसंगी शाळेतील मुलांनी विविध वेशभूषा धारण करून सुंदर प्रस्तुती सादर केली. 

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता चैताली बारई, रूपाली खरकाडे, संचाली भलमे, शबाना खान, श्रद्धा संत, मयुरी चव्हाण, अश्विनी गुरनुले, वैशाली नेजेकर, मीनाक्षी नरपांडे, पूजा गोसटकर, नीलम रंगारी, प्रगती धकाते, लक्ष्मी तिवारी, मीनाली निर्वाण, शुभांगी राऊत, भावना फटिंग, दिपाली शिरसागर, मोनाली उपासे, अश्विनी नवले, अन्नशा श्रीवास्तव आदी शिक्षिकांनी प्रयत्न केले