विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान

प्रतिनिधी दिनेश डहाके पुसला
आ.उमेश यावलकर यांच्या प्रयत्नांना यश !
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना धनादेश चे वितरण
मोर्शी:विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशानुसार निर्माण झालेल्या तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्प निर्मितीवेळी एकुण ७४०.८६ (हे.आर) क्षेत्रफळातील शेतकऱ्यांच्या जमीनी शासनाकडून संपादित करण्यात आल्या. यामध्ये ६४८ शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या आदेशानुसार हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. परंतु त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला सुरू असलेल्या दराप्रमाणे शासनाकडून प्राप्त झाला नसल्याने यावर विदर्भ बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आला होता. पाटबंधारे विभागाकडून सरळ खरेदीनुसार संपादित क्षेत्राकरिता शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे याकरिता आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने त्यांच्या अथक प्रयत्नातुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लक्ष रूपये दराने एकुण ३७ कोटी १६ लक्ष ५५ हजार रूपयांचा निधी ला पाटबंधारे विभागाकडून मंजूरात देण्यात आली आहे व सानुग्रह अनुदान देण्याबाबत तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. यानिर्णयानुसार शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ६४८ मधील ५८ शेतकऱ्याना सानुग्रह अनुदानाचे १० कोटी रुपयांचे धनादेश भाजपा उपजिल्हाध्यक्ष श्रिधर सोलव, तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, दिपक पवार, पंढरी मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक २ चे उपविभागीय अभियंता प्रमोद आर.पालवे, वरिष्ठ लिपिक प्रदिप इघे, कनिष्ठ अभियंता अभिषेक अ.पोहरे, कनिष्ठ लिपिक निकेश कुकडे, सुजाता मेश्राम, प्रीती राऊत यांच्या उपस्थितीत टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात आले. यावेळी उपस्थित भागवत हुरडे, वासुदेव खासबागे, लिलाधर ढोरे, हरिदास कोहळे अनिल फरतोडे यांच्यासह आदि शेतकऱ्यांना धनादेशचे वितरण करण्यात आले आहे.