खंडाळा येथील भवानी माता मंदिरात घटस्थापना;२९ सप्टेंबरला महाप्रसाद,अष्टमीला गोंधळ-जागरणाचा कार्यक्रम"

Sun 28-Sep-2025,09:51 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :शैलेश झाडे समुद्रपूर 

खंडाळा (ता. समुद्रपूर):खंडाळा येथील भवानी माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही घटस्थापना मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडली आहे. सुमारे दोनशे वर्षे प्राचीन असलेले हे मंदिर भक्तांच्या नवसपूर्तीसाठी प्रसिद्ध असून, भक्तांच्या हाकेला धावून येणारी म्हणून भवानी माता ओळखली जाते.

यंदाच्या नवरात्री निमित्ताने दि. २९ सप्टेंबर २०२५, वार सोमवारी (सप्तमी) महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अष्टमीच्या दिवशी खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने गोंधळ जागरणाचा कार्यक्रम भव्य स्वरूपात होणार आहे.

समुद्रपूर तालुक्यातील व परिसरातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून भवानी मातेकडून आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक:

 महाप्रसाद – दि. २९ सप्टेंबर २०२५ (सोमवार, सप्तमी) गोंधळ जागरण – अष्टमी (खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने)सर्व भाविकांनी या दिवशी उपस्थित राहून आई भवानीचा आशीर्वाद घ्यावा