महानगरपालिकेने अमरावती शहरांमध्ये 1000 बेडचा दवाखाना सुरू करावा रिपब्लिकन सेनेची मनपा आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी

Mon 09-Jun-2025,09:01 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी रवी वाहने शेंदूरजनाघाट

अमरावती:महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांची लोकसंख्या दहा लाखाच्या वर असताना महानगरपालिकेचा एकही मोठा दवाखाना अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध नाही, त्यामुळे अनेक नागरिक उपचाराअभावी अनेक समस्यांना पुढे जात आहे,नागपूर मुंबई पुणे औरंगाबाद यासारख्या शहरांमध्ये महानगरपालिकेचे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत मग अमरावती महानगरपालिके मध्ये महानगरपालिकेच्या एकही मोठा दवाखाना का नाही याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी की नागरिक ज्या नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना निवडून देतात ते जनतेच्या समस्या सोडवाव्या यासाठी प्रतिनिधी महानगरपालिकेत पाठवतात,मात्र अमरावती शहराची लोकसंख्या दहा लाखाच्या वर असताना, अमरावती जिल्ह्याचे मुख्य रुग्णालय फक्त 265 बेडचे असताना, अनेक रुग्ण उपचार अभावी मरत असताना अमरावती शहरामध्ये लोकप्रतिनिधी सर्व भोंगळ कारभार आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत असताना, महानगरपालिकेचे 1000 बेड चे हॉस्पिटल निर्माण व्हावे अशी भावना लोकप्रतिनिधींच्या डोक्यामध्ये का आली नाही,कोरोना महामारीच्या काळ सुद्धा सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या डोळ्यांनी पहात असताना कोण त्याच रुग्णांना, अमरावती शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून पुढे येताना दिसत नाही,अमरावती जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आले पण अजून त्याला दहा ते पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो तेव्हा पर्यंत अमरावती शहरातील नागरिकांनी कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा,ज्या नागरिकांकडे भरमसाठ पैसा आहे हे नागरिक कुठेही उपचार घेऊ शकतात,मात्र ज्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे,जे नागरिक सांजी आणतात आणि सांजी खातात, त्या नागरिकांनी कोणत्या दवाखान्यामध्ये जाऊन चांगला उपचार घ्यावा, असे अनेक प्रश्न निर्माण होत असताना रिपब्लिकन सेनेचे महानगर प्रमुख रुग्णसेवक सुरेश तायडे यांनी आज दिनांक ०९/०६/२०२५ रोजी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन अमरावती शहरांमध्ये महानगरपालिकेने 1000 बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची मागणी केली आहे या मागणीवर आपण विचार करू व महाराष्ट्र सरकार सोबत सुद्धा बोलणार असल्याचे मनपा आयुक्त यांनी शिष्टमंडळाला सांगितले निवेदन देताना महानगर प्रमुख रुग्णसेवक सुरेश तायडे,सचिन तेलमोरे, श्रीधर खडसे, प्रभू तायडे,मंडोधरे दादाधनराज मंडवधरे, शेख सलीम, अरविंद नगराळे ,शुभम जोशी, श्रीकृष्ण धाकडे, आकाश आठवले, रफिक शेख, अशोक तायडे, मंगेश जामणीक, इत्यादी रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते