गांजा ची वाहतुक करणाऱ्या दोन युवकांना रामनगर पोलीसानी केले गजाआड १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : गांजा अमली पदार्थांचे वाहतुक करणाऱ्या दोन आरोपी युवकांना रामनगर पोलीसानी गजाआड केले असून त्यांच्या कडून १ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. अजित रतन रॉय (३८), सत्यजित गौरंग मंडल (२९) दोन्ही रा. उदयनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली असे आरोपींचे नाव आहे. सदर कारवाई ६ जून रोजी करण्यात आली.रामनगर पोलीसांना गोपनिय बातमीदारामार्फत खबर मिळाली की आरोपी हे अवैधरीत्या गांजा सदृश्य अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करण्यासाठी येणार आहे. अशा माहिती वरुन पोलीसांनी आरोपीचा शोध घेत डॉ वरंघटीवार हॉस्पीटल समोरील मोकळया मैदान मुल रोड चंद्रपुर येथे सापळा रचुन आरोपी अजित रतन रॉय (३८), सत्यजित गौरंग मंडल (२९) दोन्ही रा.उदयनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळून १ किलो ७८१ ग्रॅम गांजा, दुचाकी क्रं. एमएच ३३ एएफ ९५८६ असे एकूण एकुण १ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. आरोपी विरुध्द रामनगर पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अँक्ट नुसार गुन्हा नोंदविला असून आरोपींना अटक करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सहा पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस अंमलदार जितेंद्र आकरे, आनंद खरात, सचिन गुरनुले, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, लालु यादव, शरद कुडे, मनिषा मोरे, रविकुमार डेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोबरे, प्रफुल्ल पुष्पलवार, शक्ती कोरवार, ब्युल्टी साखरे यांनी केले.