आ.राजु नवघरेंच्या विकासात्मक नेतूत्त्वाला साथ माजी नगराध्यक्ष नगरसेवकासह सह काँग्रेस,वंचितच्या मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Tue 24-Jun-2025,10:08 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली :वसमत विधानसभेचे विकासप्रिय आमदार राजु नवघरें यांच्या विकासात्मक नेतूत्त्वाला साथ देत वसमतचे माजी नगराध्यक्ष,माजी नगर सेवक, काँग्रेस,वंचित बहुजन आघाडी च्या मान्यवरांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला.वसमत चे विकासप्रिय आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज वसमत चे माजी नगर अध्यक्ष खलील अहेमद अब्दुल नबी,माजी नगर सेवक शेख जानिमियाँ,आदिवासी सामाजाचे युवा नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे,प्रसिद्ध गुत्तेदार यूनुसभाई पॉपुलर,शेख रशीद जानिमियाँ,सय्यद नसीर,वंचित चे भास्कर गवळी, प्रल्हाद जोंधळे, टेंभुर्णी सरपंच चे बंधू शेख याशीन,वसमत वडार समाजाचे मरिअण्णा वाघमारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष बांगर, आ.राजु भैय्या नवघरे यांच्या सह मान्यवरांची व्यासपिठावर उपस्थिती होती तर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मो.मोबीन जमीनदार,प्रा.डॉ दीपक कातोरे,महाऊर्जाचे अध्यक्ष सय्यद इमरान अली,शहर अध्यक्ष मुजीब पठाण, नदीम सौदागर,शेख हारुन दालवाले,शेख हाजी गुत्तेदार,प्रा.रमेश मानवते, अमजद खान नम्मू, मोहसीन खान एम.के,शेख मुद्दसिर,एम.डी कामरान व अनेक वसमत येथील राष्ट्रवादीचे सहकारी मित्र उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीनंतर वसमत शहरातील प्रमुख राजकीय मंडळी आमदार नवघरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आहे अजित दादा पवार वसमतला आले असता त्यावेळीही असंख्य नेते मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता आगामी जिल्हा परिषद,नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बळकट करण्याचे आ.राजु नवघरेंचे प्रयत्न आहेत